अवचितपीर तालमीच्या कार्यकर्त्याची एक्झिट; फुटबॉल खेळताना हृदयविकाराचा झटका

अवचितपीर तालमीच्या कार्यकर्त्याची एक्झिट; फुटबॉल खेळताना हृदयविकाराचा झटका

कोल्हापूर : फुटबॉल (Football)आणि कोल्हापूर (Kolhapur) हे अतूट समीकरण. लॉकडाऊन काळात तर काहीच काम नसल्याने शहरातील विविध ठिकाणी लहान मुलांचा फुटबॉल रंगलेला दिसतो. गांधी मैदानात (Gandhi Ground)अशाच रंगलेल्या खेळात अवचितपीर तालमीचे कार्यकर्ते चंद्रशेखर सरनाईक (वय ४८) (Chandrshekhar sarnaik)यांनी आज अनपेक्षितपणे आयुष्याच्या मैदानावरून कायमची एक्झिट घेतली. त्यांच्या मागे आई, वडिल, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला.

Heart attack while playing football case marathi news kolhapur

घरचा किराणा मालाचा व्यवसाय सांभाळणारे चंद्रशेखर. लॉकडाउनमुळे सकाळी अकरालाच सर्व व्यवहार बंद होत असल्याने गेली दोन दिवस सायंकाळी गांधी मैदानात ते लहान मुलांबरोबर फुटबॉल खेळायला जावू लागले. आज सायंकाळीही सहाच्या सुमारास ते फुटबॉलमध्ये रमले असताना पाय घसरून पडले आणि त्याचवेळी हृदयविकाराचा झटका आला. परिसरातील कार्यकर्त्यांनी त्यांनी तत्काळ रूग्णालयात उपचारासाठी नेले. पण, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही, अशी माहिती परिसरातील कार्यकर्त्यांनी दिली.

Heart attack while playing football case marathi news kolhapur

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com