
कोल्हापूर : घरातील जिन्याला दोरी बांधून खेळताना अचानक गळफास लागल्याने समर्थ अरुण वरुटे (वय ९) या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबीय शेतीच्या कामात असल्याने तो घरी एकटाच होता. बुधवारी सायंकाळी आरे (ता. करवीर) गावात ही घटना घडली. समर्थच्या आई, आजी, चुलतीसह नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.