
Kolhapur Accident News : वाठार-वारणानगर मार्गावरील तळसंदे (ता. हाणकणंगले) गावानजीक अनोळखी वाहनाने दिलेल्या धडकेत दोन परप्रांतीय मजूर जागीच ठार झाले. नरेंद्रकुमार बिंदराय यादव (वय २५, समनपूर, चंपारा, बिहार) व हेमंत हादीबंत पाडी (वय २६, रा. चंद्रापाडा ओडिशा) अशी मृतांची नावे आहेत. तर विनेशकुमार (वय. २७, रा. चंद्रापाडा ओडिशा, सर्व सध्या रा. कऱ्हाड, जि. सातारा) याच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. डोक्याला, छातीला, पायाला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने दोघांना जीव गमवावा लागला. आज रात्री साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला.