कोल्हापूर : जोतिबा चैत्र यात्रेला (Jyotiba Chaitra Yatra) महाराष्ट्रासह कर्नाटक, गोव्यासह विविध राज्यांतून भाविक दाखल होत आहेत. लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या सोहळ्यासाठी पोलिस यंत्रणाही सतर्क झाली आहे. यात्रेवर ड्रोनने नजर ठेवली जाणार असून, गर्दीवरील नियंत्रण व अनुचित प्रकार टाळण्यासाठी ११६ सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत.