कोल्हापूर : बंगालच्या उपसागरात शक्ती वादळ होऊन कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारीही हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत मॉन्सूनपूर्व पावसाने सोसाट्याच्या वाऱ्यासह शहरात (Kolhapur Rain) धुवाधार हजेरी लावली. जिल्ह्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस बरसला. यामुळे काढणीस आलेले भुईमूग व सूर्यफुलाचे नुकसान झाले. औद्योगिक वसाहतींमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने उत्पादन ठप्प होऊन आर्थिक फटका बसला.