कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात (Kolhapur Rain) अनेक ठिकाणी वळिवाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. इचलकरंजीत वादळी वाऱ्यामुळे भगतसिंग उद्यान परिसरात झाडाची मोठी फांदी तुटली, तर जोतिबा डोंगरावर (Jyotiba Dongar Rain) सोमवारी (ता. २८) मंदिर परिसरातील पाकाळणी (स्वच्छता) आहे. त्यापूर्वीच आज स्वच्छता झाली.