
Kolhapur Weather Update : पावसाळ्याआधीचा मुबलक पाणीसाठा आणि मागील आठवडाभराच्या पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने राधानगरी धरण जून महिन्यातच साठ टक्क्याहून अधिक भरले आहे. धरणातून ३१०० क्युसेकने पाणी विसर्ग सुरू असला तरी पाणलोट क्षेत्रातून होणारी आवक साडेचार हजार क्युसेकपर्यंत असल्याने, पाणी पातळीत दिवसागणिक एक फुटाने वाढ होत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास यंदा धरण गतवर्षीपेक्षा दोन-तीन आठवडे आधीच भरण्याची शक्यता आहे. यंदा पूरस्थितीही लवकरच येईल, अशीच स्थिती सध्याच्या पाणीसाठ्याने निर्माण केली आहे.