‘बलिदान मास पाळताना केशवपन करतात. महिनाभर पायात चप्पल घालत नाहीत. मांसाहार किंवा गोड पदार्थ खात नाहीत. यातील कोणतीही कृती कोणाच्याही भावना दुखवणारी नाही.’
कोल्हापूर : सरवडे गावातील शाळेमध्ये बलिदान मास (Balidan Mas) पाळणाऱ्या विद्यार्थ्यांवर शिक्षकाने कारवाई केली. कारवाई का केली म्हणून विचारणाऱ्या हिंदुत्ववादी (Hindu Organization) कार्यकर्त्याचे दुकान राजकीय कार्यकर्त्यांनी फोडले. संबंधित शिक्षक आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाजाने (Hindu Community) केली.