Kolhapur Lake : ९७ वर्षांचा राजाराम तलाव सांडपाण्यात गुदमरतोय; कोल्हापूरच्या पर्यावरणावर घाला
Historic Rajaram Lake Pollution Crisis : शिवाजी विद्यापीठाच्या वसतिगृहांसह हनुमाननगर, उजळाईवाडी परिसरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट राजाराम तलावात मिसळत असून त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
कोल्हापूर : गेल्या ९७ वर्षांपासून जलसिंचनासाठी उपयोगी पडत असलेल्या ऐतिहासिक राजाराम तलावामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाचे वसतिगृह, हनुमाननगर परिसरातील सांडपाणी थेटपणे मिसळत आहे.