court
sakal
कोल्हापूर - विधी शाखेच्या परीक्षेतील प्रश्नांची उत्तरे मराठीतून देता यावीत, यासाठी ६४ वर्षांच्या महिला विद्यार्थिनीने लढा दिला. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका सुरू असतानाच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांनी २०२६-२७ पासून विधी शाखेच्या परीक्षा पहिल्या वर्षापासून मराठीतूनही देता येतील; असा निर्णय घेतला.