साठेबाजी, नैसर्गिक आपत्तीमुळे खाद्य तेलाची दरवाढ

 Hoarding, increase in edible oil prices due to natural calamities
Hoarding, increase in edible oil prices due to natural calamities

कोल्हापूर  ः शेंगदाणा, सोयाबीन आणि सरकी अशा खाद्यतेलाचे भाव दसऱ्यापर्यंत तर सूर्यफुल तेल दिवाळीला सर्वसमान्यांच्या आवाक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजार, नैसर्गिक आपत्ती, वाढीव कस्टम ड्युटी आणि तेलाचा कृत्रिम साठा अशा वेगवेगळ्या कारणामुळे तेलाचे दर भडकले असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येते. 
कोरोना महामारी आणि महागाईचे संकट असतानाच तोंडावर आलेल्या दसरा दिवाळीची चिंता सर्वसमान्यांना लागली आहे. 
सणासुदीच्या दिवसांत तेल दर वाढीचा मोठा फटका सर्वसमान्यांना बसेल. वेळीच योग्य उपाय न झाल्यास महागाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांचा उद्रेक होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. स्वयंपाक घरातील बहुतांशी पदार्थांना तेलाची आवश्‍यकता असते. त्यामुळे ते खरेदीसाठी प्राधान्य द्यावे लागते. तेलाचे दर नेमके का वाढले याबाबत होलसेल, रिटेल व्यापाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर काही प्रमुख कारणे पुढे आली. यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर वाढल्यामुळे किंमत वाढली. तसेच देशात कस्टम ड्युटीमुळे किंमतीवर साधारण 35-45 टक्के होत आहे. 
चीनने लॉकडाउन काळात इंडोनेशिया, मलेशीया यासह इतर देशांकडून पुढील पाच-सहा महिन्यांचा साठा एकाच वेळी खरेदी केल्याचाही परिणाम दरावर झाला आहे. देशात राजस्थान, मध्यप्रदेशात पावसाने 30-35 टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तेथील सोयाबिनच्या तेलाची आवक दरवर्षी सप्टेंबरमध्ये होते. मात्र यावर्षी ती होऊ शकली नाही. काही व्यापाऱ्यांच्या मते तेलाचे भाव वाढणार असल्याचे संकेत होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात कृत्रिम साठा केल्याचाही परिणाम तेलाच्या दरावर झाला आहे. 
----------- 
नवीन शेती विषयक विधेयक मंजुर होण्यापूर्वीच बाजारात तेल आणि डाळींची दरवाढ होणार याचे संकेत होते. त्यामुळे किराणाभुसारी व्यापाऱ्यांपर्यंत तेल आणि इतर साठा करण्याचे निरोप आले होते. त्यामुळे ही दरवाढ कृत्रिम आहे. देश आणि राज्यपातळीवर बडे व्यापारी, किंवा ब्रॅण्ड तेल विक्रेत्यांकडे साठा अधिक असू शकतो. 
- बबन महाजन, किराणा भुसारी विक्रेते 
------------------------- 
चीनकडून खाद्य तेलाची मोठी खरेदी, भारताची कस्टम ड्युटी वाढवल्यामुळे दर वाढले आहेत. तसेच राजास्थान, मध्यप्रदेशासह विदर्भाला बसलेला पावसाचाही फटका ही कारणीभूत आहे. त्यामुळे वेळेत तेल मार्केटमध्ये आले नाही. साधारण दसऱ्यानंतर तेलाचे दर नियंत्रणात येतील. 
हितेश कापडिया ः होलसेल तेल व्यापारी 


कोल्हापूर जिल्ह्यात रोज 200 टन तेलाची मागणी 
सरकी -70 टन  
सूर्यफूल- 50 टन  
शेंगतेल-20 टन  
पामतेल-40 टन  
सोयाबिन -20 टन  

संपादन - यशवंत केसरकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com