esakal | ‘होम क्वॉरंटाईन’ असताना ते गेले बाहेर अन्....
sakal

बोलून बातमी शोधा

The Home Quarantine couple on the road Criminal offence kolhapur marathi news

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून परदेशातून आलेल्या अनेकांना अलिप्त राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यांचा संपर्क इतरांशी येऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली. परंतू

‘होम क्वॉरंटाईन’ असताना ते गेले बाहेर अन्....

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ‘होम क्वॉरंटाईन’ म्हणून हातावर शिक्का असतानाही खरेदीसाठी बाहेर पडलेल्या दाम्पत्याला आज पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची रवानगी शेंडा पार्क येथील अलगीकरणात केली. राजारामपुरी पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक श्री. घोगरे यांनी दिली.

कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून परदेशातून आलेल्या अनेकांना अलिप्त राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यांचा संपर्क इतरांशी येऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली. परदेशातून आलेल्या काही व्यक्ती थेट जनतेत मिसळत असल्याचे प्रशासनाला दिसून आले. त्यामुळे अशा व्यक्‍तींच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’ शिक्का मारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. यामुळे संबंधित व्यक्ती तातडीने ओळखून येतात. असे असतानाही जनतेत जाण्याचा प्रकार राजारामपुरीत घडला आहे.

हेही वाचा- Coronaviras : घाबरु नका ; कोल्हापूरात १९६ जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह...

‘होम क्वॉरंटाईन’ दाम्पत्य रस्त्यावर गुन्हा दाखल

पोलिसांनी सांगितले, थायलंडहून आलेल्या दाम्पत्याची कोल्हापुरात तपासणी केली. त्यांना ‘होम क्वॉरंटाईन’ केले. यासाठी त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारला होता. त्यांना सर्वांपासून अलिप्त राहण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. संबंधित दांपत्य घरी नसल्याचे पोलिसांना आढळून आले. अधिक चौकशी केली असता ते राजारामपुरीत खरेदीसाठी गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी त्यांना पकडून थेट पोलिस ठाण्यात आणले. तेथे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची रवानगी शेंडापार्कातील अलगीकरण कक्षात केली.