esakal | हनी ट्रॅपला कंटाळून यंत्रमाग कामगाराची अखेर आत्महत्या; जिल्ह्यातील घटनेने तरुणांमध्ये खळबळ
sakal

बोलून बातमी शोधा

हनी ट्रॅपला कंटाळून यंत्रमाग कामगाराची अखेर आत्महत्या

या घटनेने हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे.

हनी ट्रॅपला कंटाळून यंत्रमाग कामगाराची अखेर आत्महत्या

sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : हनी ट्रॅपने जिल्ह्यात पहिला बळी घेतला. हनी ट्रॅपला कंटाळून चंदूर येथील एका यंत्रमाग कामगाराने राहत्या घरी आत्महत्या केली. संतोष निकम (वय 32 रा.शाहूनगर ) असे त्याचे नाव आहे. ही आत्महत्या हनी ट्रॅपमुळे झाल्याचे शिवाजीनगर पोलिसांनी सांगितले. या घटनेने हनी ट्रॅपच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत दै. सकाळ'ने पोलिसांचे लक्ष वेधले होते.

हेही वाचा: तुम्ही खाताय ते वाटाणे रंगवलेले तर नाहीत ना? पहा कसे ओळखायचे?

काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून एक युवतीने संतोषला भुरळ घातली. त्यातून दोघांचं चॅटींग सुरू झाले आणि दोघांचे व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून अश्‍लिल हावभाव सुरू झाले. युवतीने त्या हावभावाचे रेकॉर्डींग करून संतोषला धमकावत पैशाची मागणीही केली. त्यामुळे संतोषला फसवणुक झाल्याची जाणीव झाली. त्यातूनच संतोषने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (2) सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात हा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या आत्महत्येनंतर हनी ट्रॅपच्या चर्चेला उधाण आले आहे.

loading image
go to top