esakal | तुम्ही खाताय ते वाटाणे रंगवलेले तर नाहीत ना? पहा कसे ओळखायचे?
sakal

बोलून बातमी शोधा

तुम्ही खाताय ते वाटाणे रंगवलेले तर नाहीत ना? 
पहा कसे ओळखायचे?

तुम्ही खाताय ते वाटाणे रंगवलेले तर नाहीत ना? पहा कसे ओळखायचे?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

हिरवा वाटाणा म्हटंल की तोंडाला पाणी सुटते. जर आपण हे सोलण्यासाठी बसलात तर बरेच वाटाणे तुम्ही खाण्यासाठी तोंडात टाकून रिकामे होता. अनेक लोक कच्चे वाटाणे खाण्याचे मोठे शौकीन असतात. ते सोलत सोलतच सुरु होतात. काही लोक तर वाटाणे खरेदी करत असताना समोर उभा राहून ते खाण्यास सुरुवात करतात.

असे अनेक छोटे मोठे किस्से यासोबत जोडले आहेत. काहीजण वाटाणे हलकेसे गरम करुनही, भाजून खातात. तर काहीजण यात चाटमसाला टाकून खातात. यात व्हिटामीन, मिनरल्स अॅंटी ऑक्सिडंट असे महत्वाचा स्त्रोत आहे. आज बाजारात फ्रोजन वाटाणे विक्रीचे प्रमाण वाढले आहे. पॅकेटमध्ये सोलून ठेवलेले वाटाणे हे फ्रीजमध्ये पॅक करुन ठेवले जातात. हे पुढील काही दिवस आपण वापरु शकतो. वाटाण्याचा हंगाम संपला की अनेकजण हा एक पर्याय म्हणून वापरतात. परंतु हल्ला यासंबधित अनेक संशयास्पद गोष्टी समोर येत आहेत.

हेही वाचा: जिममध्ये व्यायाम जरा जपूनच; पस्तिशीनंतर काळजी घ्या

हिरवे वाटाणे बाजारात पोहचेपर्यंत ती योग्य आणि हिरवे दिसावे, यासाठी या वाटाण्यांना हिरवा रंग दिला जातोय. त्यामुळे ही बाजारात पोहचेपर्यंत ताजी दिसावीत, हा त्यापाठचा हेतु असतो. परंतु हे रंग देणे आरोग्यासाठी अपायकारक आहे. यावेळ वाटाणे खाणाऱ्यांसमोर हे ओळखायचे कसे हा मोठा प्रश्न उपस्थित होतो. परंतु एका व्हिडीओतून (FSSAI) कडून हे हिरवे वाटाणे टेस्ट कसे करावे याचा एक सोपा उपाय सुचवला आहे.

हेही वाचा: 'या' पाच अवयवांची दररोज करा स्वच्छता, अनेक आजारांपासून मिळेल मुक्तता

या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे, एका काचेच्या ग्लासमध्ये मटार टाकून यात पाणी घालायचे आहे. अर्ध्या तासानंतर तुम्हाला दिसेल. यात जर रंग उतरला असेल तर समजून जा की हे यात कृत्रिम रंग मिसळले आहेत. आणि ग्लासमधील पाणी आहे तसेच राहिल्यास हिरवे वाटाणे नैसर्गिक असल्याचे समजावे. यामुळे तुमच्या आरोग्याला कोणतीही हानी पोहचणार नाही.

loading image
go to top