कोल्हापूर : पिपल फॉर एथिकल िट्रटमेंट ऑफ अॅनिमल्स (पेटा) इंडियाने पोस्टर पाहून केलेल्या तक्रारीवरून दोनवडे (ता. करवीर) आणि भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील बेकायदा मेंढ्यांच्या झुंजी आणि घोडा आणि घोडागाडी शर्यतींवर पोलिसांनी बंदी घातली. आठ आणि दहा मे रोजी या शर्यती होणार होत्या. याची पोस्टरबाजी झाली होती. बेकायदेशीर मेंढ्यांच्या झुंजीच्या कार्यक्रमाच्या आयोजकांना करवीर पोलिसांनी ठाण्यात बोलावून असे बेकायदेशीर कार्यक्रम करणार नाही, असे लेखी घेतले.