शर्यतीची गाडी हाकणाऱ्या गाडीवानाचे काळीज मर्दासारखे लागते, असे शर्यतीवेळी म्हटले जाते. त्यामुळे शर्यतीची गाडी हाकणारे त्या-त्या भागांत काही प्रसिद्ध गाडीचालक आहेत.
Baijya-Harny Bull Pair : ‘जीवा-शिवाची बैल जोडं’ म्हटले की डोळ्यासमोर शेतात राबणाऱ्या बैलांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. बेंदूर सणादिवशी नटणारा हा बैल शेतकऱ्यांचा (Farmers) मित्र... पण अलीकडे शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर वाढला आणि बैलांची जागा आता यंत्रांनी घेतली. पण, त्याचवेळी शर्यतीत (Bullock Cart Race) पळणाऱ्या बैलांनी मात्र भाव खाला आहे.