
ओंकार धर्माधिकारी
कोल्हापूर : वन्यजीव आणि माणूस एकेकाळी एकत्र जीवन जगत होते. मात्र आता वन्यजीव मानवी वस्तीत घुसू लागले आहेत. शेतीचे नुकसान करू लागले आहेत. त्यांच्या हल्ल्यात ग्रामस्थ जखमी होत आहेत. याचे मुख्य कारण वन्यजीवांचे भ्रमणमार्ग नष्ट होत आहेत. त्यांच्या प्रजननाच्या जागा सुरक्षित राहिल्या नाहीत.