मुस्लिम सुन्नत जमियत या संस्थेने पत्र्याचे शेड वजा बांधकाम केले होते. हे बांधकाम अतिक्रमित व बेकायदेशीर असल्याच्या कारणावरून काढावे, अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.
हुपरी : हुपरी (जि. कोल्हापूर) येथील अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या मदरशाचे बांधकाम हटविण्याच्या कारवाईला हुपरी नगरपालिकेने (Hupari Municipal Corporation) आज पहाटेपासून सुरुवात केली आहे. सुमारे 100 वर पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबसात ही कारवाई सुरू आहे.