दररोज एकटे दर्शनासाठी जाणारे वडिंगे काल पत्नीला सोबत घेऊन बाहेर पडले होते. मात्र, काळाने त्यांच्यावर घाव घातला.
इचलकरंजी : पंचगंगा नदी (Panchganga River) मार्गावर डंपरने (Dumper Accident) दुचाकीला धडक दिल्याने दांपत्याचा दुर्दैवी अंत झाला. डंपरच्या पुढील चाकाखाली चिरडल्याने सुनीता संजय वडिंगे (वय ५०) जागीच ठार झाल्या. त्यांचे पती संजय (५९, दोघे रा. मंगळवार पेठ, वडिंगे गल्ली, इचलकरंजी) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.