
कोल्हापूर : विभक्त पत्नीवर खुनी हल्ला करणाऱ्या अमरसिंग मारुती शिंदे (वय ३७, रा. इस्लामपूर) याला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. कौटुंबिक वाद तसेच चारित्र्यावर संशय घेत त्याने शर्मिला शिंदे (वय ३५, सध्या रा. महालक्ष्मी पार्क, हरीओमनगर परिसर) यांच्यावर शुक्रवारी रात्री हल्ला केला होता. संशयिताला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.