esakal | सभा तहकूब करण्याएेवजी विषयांना मंजुरी दिली असती तर आनंद झाला असता
sakal

बोलून बातमी शोधा

 I would have been happy if the issues had been approved instead of convening a meeting

मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. पंतप्रधान मोदी यांनी मला भेट नाकारण्याचा उल्लेख नगरसेवकांनी करणे म्हणजे केवळ राजकारणच असल्याचे म्हणत खासदार संभाजीराजे यांनी नगरसेवकांप्रती नाराजी व्यक्त केली.

सभा तहकूब करण्याएेवजी विषयांना मंजुरी दिली असती तर आनंद झाला असता

sakal_logo
By
डॅनियल काळे

कोल्हापूर ः मराठा आरक्षण हा राजकारणाचा विषय नाही, त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका. पंतप्रधान मोदी यांनी मला भेट नाकारण्याचा उल्लेख नगरसेवकांनी करणे म्हणजे केवळ राजकारणच असल्याचे म्हणत खासदार संभाजीराजे यांनी नगरसेवकांप्रती नाराजी व्यक्त केली. सभा तहकूब करण्यापेक्षा आजच्या सभेत हजारो कोटी खर्चून शहरात होणाऱ्या गॅस पाईपला परवानगी दिली असती तर बरे झाले असते, हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या टर्फसाठी निधी मंजूर आहे. तोही विषय आज मंजूर व्हायला पाहिजे होता. हे विषय मंजूर करून सभा तहकूब केली असती तरी आनंद झाला असता, असेही संभाजीराजे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

निवेदनात म्हटले आहे ः मराठा आरक्षणाला पाठिंबा आणि संभाजीराजेंना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट नाकारल्याच्या कारणावरून पालिकेची महासभा तहकूब केल्याचे मला समजले. मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यावरून सभा तहकूब करणे हे मी मान्य करतो, आणि समाजाच्या वतीने तुम्हा नेतेमंडळींचे आभारही मानतो; परंतु मला मोदींनी भेट नाकारल्याचा उल्लेख करणे म्हणजे केवळ राजकारण आहे. यामुळे मी तुम्हा सर्वांवर नाराज आहे. गेली 14 वर्षे मी मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यात सक्रिय आहे. आजपर्यंत एकदाही या विषयात राजकारण आणले नाही. मराठा आरक्षण हे माझ्यासाठी राजकारणापलीकडचा विषय आहे.

दीड वर्षांपासून हजारो कोटींचा गॅस पाईपलाईनचा प्रकल्प पालिकेची परवानगी नसल्याने रखडला आहे. त्या परवानग्या तुम्ही दिल्या असत्या, तर कोल्हापूरच्या विकासात भर पडली असती. हा प्रकल्प मंजूर करून आणण्यासाठी मी खूप मेहनत केली आहे. शहराच्या विकासात ही योजना मैलाचा दगड ठरेल. तहकूब सभेत प्रकल्पाला परवानग्या देणे आवश्‍यक होते. मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या टर्फसाठी 5.50 कोटी केंद्राकडून मंजूर करून आणलेत. त्या संदर्भातील परवानगी महासभेत दिली असती तर आनंद झाला असता. 

सर्वांना सोबत घेऊन लढणार 
मोदी यांच्या आणि माझ्या भेटीबद्दल बोलायचे झाले तर मला एकट्याला जाऊन भेटणे आणि श्रेय घेणे शक्‍य झाले असते. मी ठरवले तर कधीही भेटू शकतो; पण मला मराठा आरक्षणाच्या लढ्यात श्रेयवाद आणायचा नाही. हा लढा सर्वांचा आहे. तो सर्वांना सोबत घेऊन लढायचा आहे. त्यामुळे यामध्ये राजकारण आणू नका, असे आवाहनही संभाजीराजे यांनी केले आहे. 
 

संपादन ः रंगराव हिर्डेकर

loading image
go to top