Riva Kamble Dies During Treatment
esakal
इचलकरंजी : दूध पिताना ठसका लागल्याने श्वास घेण्यास अडथळा निर्माण झालेल्या एक वर्षाच्या चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रिवा विकी कांबळे (रा. गावभाग, चंदूर, ता. हातकणंगले) असे तिचे नाव आहे. शिवाजीनगर पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. गेल्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारचा हा दुसरा मृत्यू (Ichalkaranji baby death after milk choking) आहे.