

इचलकरंजी : ‘माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे. व्यवसायातील नुकसान आणि मानसिक तणाव सहन न झाल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या अंत्यसंस्कारावेळी चितेला अग्नी माझ्या जवळच्या मित्रांनी द्यावा’, अशी हृदयद्रावक सुसाईड नोट लिहून एका व्यावसायिकाने हॉटेलच्या खोलीत गळफास घेऊन जीवन संपवले. ही धक्कादायक घटना येथील एका हॉटेलमध्ये उघडकीस आली. अभिजित सुभाष पाटील (वय ४२, मूळ रा. शहापूर, सध्या रा. जोगेश्वरी, मुंबई) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.