esakal | सारथीबाबतच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात : संभाजीराजे
sakal

बोलून बातमी शोधा

सारथीबाबतच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात : संभाजीराजे

सारथीबाबतच्या मागण्या सरकारने लवकर पूर्ण कराव्यात : संभाजीराजे

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापुर : सारथी संस्थेची बोर्ड मिटींग 14 जुलैला होणार आहे. या बैठकीत सारथीच्या विविध विषयावर चर्चा होईल. बैठकीतच पुढील लाईन ऑफ अॅक्शन ठरेल अशी माहिती युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. सारथीच्या पहिल्या उपकेंद्राचं उद्घाटन 26 जून ला झाल्यानंतर सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर कोल्हापूर काल पासून दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज छत्रपती कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते.

हेही वाचा: 'आता बस्स! सोमवारी दुकाने उघडण्यास परवानगी नाही मिळाली तर रस्त्यावर उतरु'

ते म्हणाले, सारथीच्या संदर्भात आम्ही केलेल्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. मंजुर झालेल्या मागण्यांची प्रत्यक्षात पुर्तता सुरु होणे गरजेचे आहे. आम्ही 1 हजार कोटींची मागणी केली आहे. यातील थोडी तरी रक्कम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तात्काळ मंजूर करावी. एका वेळी रक्कम देता येणार याची आम्हाला कल्पना आहे. पण काही टप्पे करून सारथीसाठी हे पैसे उपलब्ध करून द्यावे. कोल्हापूर येथे उपमुख्य केंद्र करण्याची मागणी असेल तर ती योग्यच आहे.

पुढे ते म्हणाले, सारथीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. मात्र बोर्ड मिटिंग व्हायला हवी होती ती काही कारणामुळे झाली नाही. मी दोन दिवसात उपमुख्यमंत्र्यांना फोन करून निधी उपलब्ध करून देण्या बाबत विनंती करेन. आरक्षणाबात फक्त ठराव करून चालणार नाही, ठराव हा एक भाग आहे. राज्य सरकारने पुढील कार्यवाही योग्यरित्या करावी. शासनाला एक महिन्याची मुदत दिली होती ती संपत आली असली तरी ती 10 ते 15 दिवस वाढू शकेल. त्या नंतर मूक आंदोलनाचे शस्त्र असेलच. आंदोलन हाच योग्य मार्ग आहे. समाजाला वेठीस न धरता लोकप्रतिनिधींना प्रश्न करायला हवेत. रस्त्यावर येऊन काही होणार नाही. दबाव तंत्र वापण्याची खरी गरज आहे, असे ही ते म्हणाले.

loading image