

Fodder Market Awaiting
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी शहरात नागरिकांच्या गरजांचा विचार करून आठवडा भाजीपाला बाजारासाठी निश्चित, सुसज्ज आणि शिस्तबद्ध व्यवस्था केली आहे. मात्र त्याच शहरात जनावरांच्या पोटाची भूक भागवणारा वैरण बाजार आजही हक्काच्या जागेसाठी झगडतो आहे. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ हा बाजार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हकलला जात असून आजही रस्त्यावरच भरत आहे.
- ऋषिकेश राऊत