esakal | इचलकरंजी : गणेश मुर्ती विक्रीसाठी आठ ठिकाणी जागा निश्चीत
sakal

बोलून बातमी शोधा

eco friendly ganesh

इचलकरंजी : गणेश मुर्ती विक्रीसाठी आठ ठिकाणी जागा निश्चीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : शहरात विविध ठिकाणी गणेश मुर्ती विक्रीचे स्टॉल लागले असतांना आज पालिकेने एक नवा फतवा जारी केला आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी गणेश मुर्ती विक्रीसाठी आठ ठिकाणे निश्चीत केली आहेत. या व्यक्तीरिक्त अन्य ठिकाणी गणेश मुर्ती विक्रीस ना - हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असा इशारा पालिकेकडून देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

गणेशोत्सव आठ दिवसांवर आला आहे. तर गेल्या आठ दिवसांपूर्वीच शहरात विविध ठिकाणी गणेश मुर्तींचे स्टॉल लागले आहेत. हळूहळू मुख्य मार्गावर गणेश मुर्तीसह सजावटीचे स्टॉल लागत आहेत. गेल्यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचे पूर्णतः संकट होते. यंदा मात्र कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आतापासूनच गणेश भक्तांमध्ये उत्साह आहे. एकिकडे मंगलमय वातावरणाला सुरुवात होत असतांना पालिकेच्या एका नव्या फतव्यांने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शहरात विविध ठिकाणी गणेश मुर्तींचे बहुतांशी स्टॉल लागले असतांना आज पालिकेकडून एक निवेदन जारी केले आहे. यामध्ये गणेश मुर्तींसाठी विविध आठ खुल्या जागा निश्चीत केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राजर्षी शाहू पूतळा ते महात्मा गांधी पुतळा या मार्गावर तसेच कलानगरमधील कुंभार गल्लीत गणेश मुर्ती घेवून जाण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गणेश मुर्ती विक्रीचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या निर्णयानुसार निश्चीत केलेल्या आठ ठिकाणीच गणेश मुर्ती विक्रीचे स्टॉल लावता येतील, असे पालिका प्रशासनाने जाहीर केले आहे. या व्यक्तीरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणी गणेश मुर्ती विक्रीसाठी परवाना मिळण्यासाठी पालिकेकडून ना - हरकत प्रमाणपत्र दिले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मुख्य मार्गावर स्टाॅल लावण्यास मनाई करण्यात आल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामध्ये कुंभार बांधवांची भमिका महत्वाची ठरणार आहे.

गणेश मुर्ती विक्रीसाठीची ठिकाणे

  • योग जिम्नॅशियम ग्राऊंड

  • कै.आण्णाभाऊ साठे मैदान (आवळे गल्ली)

  • जुने बसस्थानक (इंडस्ट्रीयल इस्टेट)

  • हाॅकी मैदान (खंजीरे मळा)

  • शहापूर गायरान (विनायक हायस्कूल मागे)

  • स्वामी अपार्टमेंट नजिक (खुलै मैदान)

  • लायन्स ब्लड बँकेनजिक खुली जागा (दाते मळा) ८) वंदे मातरम मैदान (विक्रमनगर).

गणेशोत्सव मंडळाना इशारा

गणेशोत्सव मंडळांनी कमाल १० बाय ८ फुटापेक्षा जास्त आकाराचा मंडप घातल्यास अतिक्रमण पथकामार्फत कारवाई करण्यात येईल, अशा इशारा मुख्याधिका-यांनी जाहीर सूचनेव्दारे दिला आहे.

loading image
go to top