

Screenshots of gang-related social media
sakal
इचलकरंजी : शहरातील रस्त्यांवर दहशत माजवणाऱ्या टोळ्यांनी आता सोशल मीडियालाच रणांगण बनवले आहे. ‘भाई’, ‘किंग’, ‘साम्राज्य’, ‘गँग’, ‘बकासूर’ अशा टोपणनावांनी तयार झालेल्या अकाउंट्सवरून एकमेकांना खुलेआम आव्हान देणे, धमक्या देणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष हल्ले करून त्यांचे व्हिडिओ ‘रिल्स’ स्वरूपात व्हायरल करणे, हा नवा आणि धोकादायक पॅटर्न शहरात दिसू लागला आहे.