

Ichalkaranji Garbage Depot Crisis
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी शहरात दररोज सुमारे १०० ते ११० टन घनकचऱ्याची निर्मिती होते. हा घनकचरा आसरानगरमधील डेपोवर टाकला जातो. येथे वर्षानुवर्षे साचलेल्या घनकचऱ्याचा डोंगर आहे. या परिसरातच मोठी नागरी वस्ती आहे. घनकचऱ्याला सतत आग लागत असल्यामुळे परिसरात धुराचे लोट पसरतात.