Ichalkaranji gas fire : इचलकरंजीत नॅचरल गॅस पाईप्सच्या साठ्याला आग, १० किमीपर्यंत धुराचे लोट

Ichalkaranji smoke visible 10 km : इचलकरंजीतील गॅस पाईप्सच्या साठ्याला मोठी आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. आगीमुळे १० किमीपर्यंत काळ्या धुराचे लोट दिसत आहेत.
natural gas pipes storage area in Ichalkaranji

natural gas pipes storage area in Ichalkaranji

esakal

Updated on

gas pipeline storage fire : इचलकरंजी येथील शांतीनगर परिसरातील आरगे भवनजवळील ओढ्याच्या काठावर नॅचरल गॅस पाईप्सच्या साठ्याला भीषण आग लागली. आज सकाळी पावणेअकराच्या सुमारास लागलेल्या आगीने परिसर धुराने व्यापला होता. आगीत सुमारे एक हजार ७०० मीटर लांबीच्या नॅचरल गॅस पाईप्सचा साठा जळून खाक झाला असून, सुमारे १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग अनोळखीने लावल्याचा अंदाज असून, याबाबत गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. आकाशात उसळणारे काळेकुट्ट धुराचे लोट तब्बल १० किलोमीटरवरूनही दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com