esakal | पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली: नागरिकांना सतर्कतेचा इशारा;इचलकरंजी - हुपरी मार्ग बंद पडण्याची शक्यता
sakal

बोलून बातमी शोधा

पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली: नागरिकांना सतर्कतेचा इशारा

इचलकरंजी - हुपरी मार्ग बंद पडण्याची शक्यता; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली: नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
पंडीत कोंडेकर

इचलकरंजी (कोल्हापूर) : येथील पंचगंगा (Panchganga River)नदीवरील जूना पूल पाण्याखाली गेला आहे. तर पाण्याची पातळी झपाट्यांने वाढत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पूराचे पाणी नागरी वस्तीत येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना पालिका प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पंचगंगा नदीपात्रातील पाणी बाहेर पडले असून नदीघाट परिसर पूराच्या पाण्याखाली आला आहे. जूना पूलावर पाणी आले असून यापूर्वीच पालिका प्रशासनाने वाहतूक बंद केली आहे. सद्या हुपरीकडे जाण्यासाठी नव्या पूलाचा वापर केला जात आहे. पण पुढील कांही तासात इचलकरंजी - हुपरी मार्ग बंद पडण्याची शक्यता आहे. गेल्या २४ तासात ५ फुट पाणी वाढले आहे. वरद विनायक मंदिरात पाणी घुसले असून स्मशान भूमी परिसर पूराच्या पाण्याने वेढला आहे.

पाण्याची पातळी सांयकाळी ६२ फुटावर होती. इशारा पातळी ६८ फुटावर असून पावसाचा जोर कायम राहिल्यास नागरी वस्तीत पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने संभाव्य पूरबाधीत क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर नदी तिरावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. गेली दोनदिवस तुरळक पडणा-या पावसांने आज वेग घेतला. शहराला दिवसभर मुसळधार पावसांने झोडपून काढले. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. परिणामी जनजीवन पूर्णतः ठप्प झाले आहे.

हेही वाचा: कोल्हापूर: तुळशी धरणात 12 तासात 400 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद

पंचगंगा नदीवरील जूना पूल पाण्याखाली

२४ तासात ५ फुट पाणी पातळीत वाढ

वरदविनायक मंदिरात पाणी शिरले

स्मशानभूमीला पूराच्या पाण्याचा विळखा

संभाव्य पूरबाधीत क्षेत्रात अलर्ट जारी

नदी तीरावर आपत्कालीन यंत्रणा सज्ज

loading image