esakal | कोल्हापूर: तुळशी धरणात बारा तासात ४०० मि.मी. पावसाची विक्रमी नोंद
sakal

बोलून बातमी शोधा

कोल्हापूर: तुळशी धरणात 12 तासात 400 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद

कोल्हापूर: तुळशी धरणात 12 तासात 400 मि.मी. पावसाची विक्रमी नोंद

sakal_logo
By
टीम ईसकाळ टीम

धामोड (कोल्हापूर) : जिवघेणा पाऊस काय असतो याचा अनुभव आज धामोडसह तुळशी परिसराने घेतला. तुळशी धरणाच्या (Tulshi Dam)पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे बारा तासात ४०० मी.मी. विक्रमी पावसाची नोंद झाली . सकाळी सहा ते सायंकाळी चार पर्यंत २९२ मीमी पाऊस नोंदला होता. त्यानंतरच्या दोन तासात म्हणजे सहापर्यंत १०८ मीमी असा बारा तासात पावसाने विक्रम केला आहे. (Tulshi-dam-rainfall-record-400-mm-in-12-hours-Kolhapur-rain-update-akb84)

धरणात सुमारे ४४०० क्‍युसेकने पाण्याची आवक होत असल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली . त्यामुळे धरण ७० टक्के भरले आहे . धामोड- राशिवडे मार्गावर ओढ्यावरती पाणी आल्याने सहा तास जनजीवन विस्कळीत झाले.

दरम्यान धरणाची पाणी पातळी ६१०.६१ मी. झाली असुन २४१० द.ल.घ.फू साठा आहे. धरणात १८६ द.ल.घ.फू पाण्याची वाढ झाली.आज सकाळपासून धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू होती. धरण क्षेत्रात सकाळी सहा ते दुपारी चार पर्यंत दहा तासात २९२ मि.मी. पाऊस झाला. तसेच बारा तासात ४००मि.मी. पावसाची नोंद झाली. धरण क्षेत्रात आजअखेर २१२७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे .

केळोशी येथील लोंढा नाला प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सुमारे १५०० क्यूसेक पाण्याचा विसर्ग धरण क्षेत्रात येत आहे. सलग कोसळणाऱ्या पावसाने परिसरात उस शेतीचे नुकसान झाले. दरम्यान खामकरवाडी प्रकल्पातील अतिरिक्त पाण्याच्या विसर्गामुळे तुळशी नदीच्या पात्रात वाढ झाली आहे.

हेही वाचा: भुदरगडात वेदगंगेला पूर; आजऱ्यात 5 बंधारे पाण्याखाली

तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यापूर्वी ५ ऑगस्ट २०१९ साली येथे झालेल्या १२ तासातील ३३८ मि.मी. पावसाची नोंद उच्चांकी होती. आजच्या पावसाने १२ तासात ४०० मि.मी. पावसाची विक्रमी नोंद केली असल्याची माहिती येथील शाखा अभियंता विजय आंबोळे यांनी दिली.

loading image