

industrial wastewater pollution affecting
sakal
इचलकरंजी : औद्योगिक क्षेत्रातून निघणारे सांडपाणी सीईटीपी प्रकल्पातून शंभर टक्के प्रक्रिया करूनच सोडावे. तसेच हे पाणी नदी-ओढ्यांत न सोडता अन्यत्र वापरावे. १५ दिवसांत सांडपाण्याबाबत आवश्यक कार्यवाही न झाल्यास संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी दिला.