esakal | इचलकरंजी: गणेशमूर्तींचा तुटवडा, मंडळांची धावाधाव
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी: गणेशमूर्तींचा तुटवडा, मंडळांची धावाधाव

इचलकरंजी: गणेशमूर्तींचा तुटवडा, मंडळांची धावाधाव

sakal_logo
By
टीम ई सकाळ

इचलकरंजी: गणेशमूर्तींचा तुटवडा भासणार हे कुंभारांचे भाकीत आता खरे ठरताना दिसत आहे. गणेशोत्सव तोंडावर आला असताना गणेशमूर्तींचा बाजारात तुटवडा स्पष्टपणे जाणवू लागला आहे. शहरात यंदा नेहमीपेक्षा स्टॉलवर मूर्तींचे प्रमाण कमी आहे. गणेश मंडळांना तर चार फुटाच्या मुर्तीसाठी धडपडावे लागत आहे. परिणामी मंडळांच्या गणेशमूर्तीचे चांगलेच वाढले आहे. दोन आठवड्यातील अचानक वाढत्या दराने मंडळे संभ्रमात आहेत.

हेही वाचा: स्वाभिमानीचे जलसमाधी आंदोलन;पाहा व्हिडिओ

गतवर्षीच्या कोरोनाचा जबर फटका मूर्तिकारांना बसला. यंदा कोरोनातून सावरण्याची चिन्हे दिसत असताना महापुराचे संकट ओढवले. कधी नव्हे ते गणेशमुर्तीसाठी व्यापाऱ्यांना परजिल्हे गाठावे लागले. अगदी गणेशोत्सवापर्यंत मुर्त्यांची ने-आन होणाऱ्या कोल्हापुरातील बापट कॅम्पमध्ये पंधरा दिवसांपूर्वी मूर्तींची निर्यात थांबली आहे. प्लास्टर बंदीच्या संभ्रमावस्थेत मूर्तिकारांनी हात आखडताच घेतला होता. घरगुती गणेशमूर्ती प्रत्येक स्टॉलवर कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात घरगुती गणेशमूर्तींचे दर वाढते आहेत. गणेशोत्सव तोंडावर असताना कमी होणारे दर वाढल्याने नागरिक गोंधळात आहेत.

घरगुती गणेशमूर्ती नंतर शेवटच्या आठवड्यात मूर्तिकार मंडळांच्या मूर्त्यांची कामे जोरात करतात. गणेशोत्सवासाठी शासनाने लागू केले निर्बंध पाहून आता अनेक मंडळे गणेशमुर्तीसाठी बाहेर पडत आहेत. मात्र जेमतेममुर्त्या तयार केल्याने सध्या मंडळांच्या मुर्त्यांचा तुटवडा भासत आहे. उत्पादित ठिकाणी मुर्त्या संपल्याने उरलेल्या चार दिवसात मोठ्या गणेशमूर्ती तयार करणे अशक्य आहे. अशा परिस्थितीत आता गणेश मंडळाचा पेच निर्माण झाला आहे.

मिळेल त्या दरात बुकिंग

चार फुटाच्या गणेशमूर्तींचा तुटवडा निर्माण झाल्याने आपोआप मूर्तींचे दर वाढले आहेत. शिल्लक मूर्त्यांसाठी मंडळे आग्रही असून मिळेल ती मूर्ती बुकिंग करावी लागत आहे. अगोदरच वाढलेले दर आणि आता तुटवड्यामुळे गणेश मूर्तींचे दर अफाट वाढले आहेत. त्यामुळे मिळेल त्या दरात गणेश मूर्ती बुकिंग करताना मंडळे दिसत आहेत.

"गतवर्षाची मागणी लक्षात घेता यंदा चार फुटाच्या गणेश मूर्तींवर भर कमी दिला. मात्र यावर्षी आता अचानक मागणी वाढल्याने मूर्ती शिल्लक नाहीत. यामुळे तुटवडा जाणवत आहे." - शंकर कुंभार, मूर्तिकार

loading image
go to top