Ichalkaranji Muncipal : स्वीकृतसह विषय समिती सदस्यांच्या निवडी; इचलकरंजी महानगरपालिका, समर्थकांचा गुलालाची उधळण करत जल्लोष
Committee Selection : इचलकरंजी महानगरपालिकेच्या सभेत आज स्वीकृत नगरसेवकांसह विविध विषय समित्यांच्या सदस्यांची घोषणा होताच सभागृहात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिका सभेत सहा स्वीकृत नगरसेवकांची आज निवड जाहीर करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे भाजपकडून प्रकाश दत्तवाडे, अविनाश कांबळे, इम्रान बागवान व मारुती पाथरवट यांना संधी देण्यात आली.