Ichalkaranji Municipal Corporation
esakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या (Ichalkaranji Municipal Corporation) पहिल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आज संपली. यामध्ये दोन दिवसांत ३८३ उमेदवारांपैकी तब्बल १५३ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. यामध्ये १० विविध राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे निवडणूक रिंगणात तब्बल २३० उमेदवार असणार आहेत.