esakal | इचलकरंजी महापालिका खरोखरच होणार काय? I Ichalkaranji Municipal
sakal

बोलून बातमी शोधा

Ichalkaranji   Municipality New President Preparation

इचलकरंजी महापालिका खरोखरच होणार काय?

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी - इचलकरंजी महापालिका होणार काय, अशा प्रश्नार्थक चर्चेने शहरात सद्या जोर धरला आहे. पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आली असतांना या चर्चेला अधिक महत्व आले आहे. मात्र सद्यस्थीती पाहता तांत्रिक अडचणीमुळे तातडीने महापालिका होण्याचा निर्णय होणे कठिण दिसत असल्याचे राजकीय तज्ञाचे मत आहे. जर शासनाने मनावरच घेतले तर महालिका होण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागू शकतो. एकूणच नजिकच्या काळात महापालिका होणार की नाही, याबाबत मात्र शक्यता पडताळण्याचे काम सुरु झाले आहे.

गेल्या दहा वर्षापासून इचलकरंजी महानगरपालिका करण्याचा विषय प्रलंबीत आहे. कोल्हापूर येथे झालेल्या एका बैठकीवेळी हा विषय चर्चेला आला. खासदार धैर्यशील माने यांनी या विषयाला पून्हा एकदा तोंड फोडले. काल मंगळवारी मुंबईत झालेल्या बैठकीतील निर्णयानंतर पून्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. त्यामुळे महापालिका खरोखरच होणार काय, आगामी सार्वत्रिक निवडणूक पालिकेची कि महापालिकेची होणार, महापालिका झाल्यास शहराला फायदा होणार की तोटा असे अनेक प्रश्न चर्चेतून उपस्थीत केले जात आहेत. वास्तविक महापालिका होण्याची प्रक्रिया तातडीने होणे थोडे कठिण आहे. पण राज्य शासनाने मनावर घेतल्यास कांहीही होवू शकते.

हेही वाचा: राज्य शासनाकडून खुशखबर! इचलकरंजी मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी

केवळ इचलकरंजीच नव्हे तर राज्यातील अंबरनाथ, जालना, यवतमाळ अशा अनेक शहरांना महापालिका होण्याचे वेध लागले आहेत. त्यांचेही प्रस्ताव प्रलंबीत आहेत. त्यामुळे शासन पातळीवरुन धोरणात्मक निर्णय घेतल्यास तांत्रिक अडचणी दूर झाल्यास येत्या वर्षभरात महापालिका होण्याची प्रक्रिया पूर्ण होवू शकते, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. तोंडावर सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे महापालिका होवू शकते काय, याचा कानोसा घेण्यात येत आहे. जर शासनाने निर्णय घेतल्यास एक वर्ष प्रशासक येवू शकतो. त्यानतंर महापालिकेची प्रक्रीया पूर्ण होवून सार्वत्रिक निवडणूका पार पडू शकतात.

वास्तविक महापालिका होण्यासाठी किमान ३ लाख लोकसंख्यची प्रमुख अट आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार इचलकरंजीची लोकसंख्या २ लाख ८८ हजार इतकी आहे. सद्या ती ३ लाखाच्या पुढे आहे. पण ही संख्या शासकीय पातळीवर गृहीत धरली जात नाही. त्यामुळे ही तांत्रिक अडचण महापालिका निर्मितीमध्ये येवू शकते. सन २०२१ ची जनगणना पूर्ण झाल्यानंतर महापालिकेचा मार्ग आपोआप खुला होणार आहे. पण त्यासाठी दिर्घ कालावधी लागणार आहे. तो पर्यंत पालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे सन २०२६ ची सार्वत्रिक निवडणूक मात्र महापालिका होवूनच होणार हे मात्र कोण्या जोतिष्याने सांगण्याची गरज नाही. तथापि, विद्यमान नगरपालिकेची हद्दवाढ करुन लोकसंख्येच्या अटीची पूर्तता करण्याचाही पर्याय असू शकतो, असे तज्ञाचे मत आहे.

हेही वाचा: उदे गं अंबे उदे! कोरोना नियमांचे पालन करत भाविकांनी घेतले दर्शन

इच्छुक धास्तावले...!

पालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आहे. अनेक इच्छुकांनी जय्यत तयारी केली आहे. विद्यमान नगरसेवकही गतीने कामाला लागले आहेत. पण महापालिका होणार असल्याची चर्चा सुरु झाल्यामुळे इच्छुक उमेदवार संभ्रमावास्थेत आहेत. त्यामुळे महापालिका होणार की नाही, याबाबत सर्वाधिक धास्ती इच्छुक उमेदवारांमध्ये असल्याचे दिसून येत आहे.

`महापालिका निर्मितीसाठी लोकसंख्येच्या पूर्ततेबाबत तांत्रिक अडचण असली तरी शासन कांही मार्ग काढून अधिसूचना काढू शकते. मात्र त्यासाठी लागणारा सगळा कालावधी विचारात घेता ही प्रक्रिया पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीपर्यंत पूर्ण होणे अशक्य वाटते. त्यामुळे महापालिका निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पालिकेवर प्रशासकाची नियुक्त होवू शकते. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर महापालिका निवडणूक होवू शकते.`

- विठ्ठल चोपडे, अभ्यासू नगरसेवक

loading image
go to top