esakal | राज्य शासनाकडून खुशखबर! इचलकरंजी मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य शासनाकडून खुशखबर! इचलकरंजी मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी

सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी या कामासाठी निधी मंजूर केला आहे.

राज्य शासनाकडून खुशखबर! इचलकरंजी मतदार संघासाठी 1 कोटीचा निधी

sakal_logo
By
पंडित कोंडेकर

इचलकरंजी : आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील चंदूर, कबनूर, खोतवाडी, कोरोची व तारदाळ या पाच गावातील विविध विकासकामांसाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक न्यायमंत्री नामदार धनंजय मुंडे यांनी या कामासाठी निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा: 'जनतेला नियम पाळण्याचं आवाहन, स्वत: दसरा मेळावा घेणार'

विधानसभा निवडणूकपूर्वी आमदार प्रकाश आवाडे यांनी मतदारसंघात समाविष्ट चंदूर, कबनूर, खोतवाडी, कोरोची व तारदाळ या पाच गावांचा विकासाला प्राधान्य देण्याचा शब्द दिला होता. यानिमित्ताने त्यांनी दिलेल्या वचनाची पूर्तता केली आहे. या पाचही गावातील रस्त्यांचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण, आरसीसी गटार्स, पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामासंदर्भात ग्रामपंचायतींकडून आमदार आवाडे यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमदार आवाडे यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता. त्याला यश आले असून नामदार मुंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना अंतर्गत विविध कामांसाठी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

हेही वाचा: बेळगाव - ‘पॅट्रिआरकी अँड द पँगोलिन’ पुस्तकाला टॉप-१० चा मान

चंदूर गावभाग येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे आणि माळभाग मलाबादेनगर, साईनगर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे, कबनूर येथील रत्नाकर बँक ते सुतार मळा आरसीसी गटर्स करणे, कोरोची येथील सिध्दार्थनगर, इंदिरानगर, गावभाग मागास वसाहतीतील हाफ राऊंड व आरसीसी गटर्स आणि रस्ते करणे, खोतवाडी येथील लोकमित्र कारखाना परिसरातील रस्ता डांबरीकरण करणे, साठे वस्ती (उत्तमनगर) रस्ता डांबरीकरण करणे आणि मागासवर्गीय वसाहतीत पेव्हींग ब्लॉक बसविणे, तारदाळ येथील बौध्द समाज येथे आरसीसी गटर्स करणे, डाकरेनगर (चर्मकार वसाहत) येथील गटर्स आणि रस्ते करणे, महात्मा गांधीनगर येथील गटर्स आणि रस्ते करणे आणि डाकरेनगर (बौध्द समाज वसाहत) येथील गटर्स आणि रस्ते करणे अशी कामे मंजूर झाली आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. या सर्वच कामांना लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती आमदार प्रकाश आवाडे यांनी यावेळी दिली.

loading image
go to top