Election-time activism
sakal
कोल्हापूर
Ichalkaranji Election : चार वर्षे कुठे होते? निवडणूक जाहीर होताच नेत्यांची अचानक समाजकारणात एन्ट्री, इचलकरंजीकर संतप्त
Election-time activism : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागरिक प्रश्नांसाठी वाऱ्यावर, निवडणूक जाहीर होताच नेत्यांची सक्रियता, पण विश्वासाचा तुटलेला दुवा
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय आणि सामाजिक हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहेत, मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत नागरिकांच्या प्रश्नांसाठी फारसे कोणी पुढे आले नव्हते.

