

Police Verification Rush
sakal
इचलकरंजी : महापालिका निवडणुकीचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी एक दिवस उरल्याने इच्छुक उमेदवारांची धावपळ वाढली आहे. निवडणूक आयोगाकडे सादर करावयाच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी दोन दिवसांपासून शहरातील पोलिस ठाण्यात चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रासाठी मोठी गर्दी उसळल्याचे चित्र आहे.