

Campaign Enters Crucial Phase
sakal
इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या (शुक्रवार ता.२) माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. यामध्ये लवकरच दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा आयोजित करण्याबरोबरच प्रभाग पातळीवर कॉर्नर सभा होणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून जागा निश्चित केल्या आहेत.