Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

Ichalkaranji Municipal Election Result 2026 : इचलकरंजी महापालिका निवडणुकीत भाजप-शिवशाहू विकास आघाडी यांच्यात कांटे की लढत झाली.
Ichalkaranji Municipal Election Result 2026

Ichalkaranji Municipal Election Result 2026

esakal

Updated on

Ichalkaranji Municipal Election Result 2026 Won Candidate Complete List : इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट झाले. काही प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली, तर अनेक प्रभागांमध्ये शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार पुढे असल्याचे दिसून आले. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.

राजीव गांधी भवन येथे मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या तासाभरातच निकालाचे कल स्पष्ट होऊ लागले होते. सातव्या फेरीनंतर आकडेवारी अधिक ठळक होताच महायुती आघाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट झाले. त्यानंतर सर्वाधिक आघाडीवर असलेले उमेदवार निश्चितपणे निवडून येणार असल्याची खात्री समर्थकांना पटताच राधाकृष्ण चौक, थोरात चौकसह विविध भागांत जल्लोषाला सुरुवात झाली.

उमेदवारांच्या विजयानंतर समर्थकांनी मतमोजणी केंद्राचा परिसर सोडत आपापल्या प्रभागात जल्लोषासाठी मोर्चा वळविला. प्रत्येक प्रभागात जल्लोषाची पूर्वतयारी आधीच केली होती. गुलालाने भरलेली जेसीबी, हारांनी सजवलेल्या क्रेन, पारंपरिक वाद्यांच्या गजरात विजयी उमेदवारांचे जंगी स्वागत केले. काही ठिकाणी क्रेनच्या साहाय्याने उमेदवारांना मोठे हार घातले, तर जेसीबीतून गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com