Ichalkaranji Election Result
esakal
Ichalkaranji Election Result : इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत यंदा भाजप आणि शिवशाहू विकास आघाडी यांच्यात अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. शहरातील बहुतांश प्रभागांमध्ये दोन्ही प्रमुख आघाड्यांमध्ये कांटे की टक्कर सुरू असल्याचे चित्र मतमोजणीदरम्यान स्पष्ट झाले. काही प्रभागांमध्ये भाजपच्या उमेदवारांनी आघाडी घेतली, तर अनेक प्रभागांमध्ये शिवशाहू विकास आघाडीचे उमेदवार पुढे असल्याचे दिसून आले. त्यामुळे इचलकरंजीच्या राजकीय समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.