Municipal School : इचलकरंजीत महापालिका शाळांचे अभिलेख धोक्यात; शैक्षणिक वारसा झिजण्याच्या मार्गावर
Records at Risk : इचलकरंजीतील महापालिकेच्या २४ समायोजित शाळांचे जुने अभिलेख सध्या असुरक्षित अवस्थेत असून त्यांची झीज होत आहे. प्रवेश नोंदी, निकालपत्रे, सेवा पुस्तिका आणि प्रशासकीय आदेश यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे जतन न झाल्यास विद्यार्थ्यांच्या हक्कांवर परिणाम होऊ शकतो.
इचलकरंजी : महापालिकेच्या शाळांतील घटती पटसंख्या हा चिंतेचा विषय असतानाच समायोजन केलेल्या २४ शाळांच्या पुरातन दस्तऐवजांची झालेली दुरवस्था अधिक गंभीर प्रश्न बनला आहे.