

Police inspect the Ichalkaranji ST stand parking area where the attack took place.
sakal
इचलकरंजी : थकीत पगार देण्याच्या कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी झोपलेल्या पे-पार्किंग चालकावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात गजानन बापू मुदगल (वय ४५, रा. विक्रमनगर, इचलकरंजी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.