इचलकरंजी : इचलकरंजी विधानसभा (Ichalkaranji Assembly Election) क्षेत्रात भाजपचे तीन मंडल अध्यक्ष निवडण्यात येणार आहेत. यातील एका मंडल अध्यक्ष निवडीवरून भाजपमधील माजी आमदार प्रकाश आवाडे (Prakash Awade) व सुरेश हाळवणकर (Suresh Halvankar) यांच्यात संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या दोन मंडल अध्यक्षपदाच्या नावाबाबत एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे; तर उर्वरित एका मंडल अध्यक्ष निवडीबाबत आवाडे-हाळवणकर गटात एकमत न झाल्यामुळे गुंता वाढला आहे. दोन माजी नगरसेवकांची यासाठी चुरस सुरू आहे.