Citizens visiting government offices for record-related documents in Ichalkaranji.
sakal
कोल्हापूर
Ichalkaranji Record Office : सहा वर्षे उलटली तरी रेकॉर्ड शहराबाहेरच; वस्त्रनगरीतील प्रशासनाचा विस्कळीत कारभार
Citizens Forced : इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात अपर तहसील कार्यालय सुरू होऊन सहा वर्षे उलटली, तरी अत्यावश्यक असलेला रेकॉर्ड विभाग शहरात न आल्याने नागरिकांचा संयम संपत चालला आहे.
संदीप जगताप :
इचलकरंजी : वस्त्रनगरीमध्ये अपर तहसील कार्यालय सुरू होऊन सहा वर्षांचा कालावधी उलटला आहे. तरी या कार्यालयासाठी अत्यावश्यक असलेला रेकॉर्ड विभाग हातकणंगले तहसील कार्यालयातच कार्यरत असल्याने नागरिकांचा त्रास सहन करावा लागत आहे.

