
ऋषिकेश राऊत
इचलकरंजी : शहर आणि परिसरात गोदामांचे पेव फुटले आहे. वेस्टेज सूत, कापूस, कापड, भंगार अशा अत्यंत ज्वलनशील वस्तूंचा साठा अग्निसुरक्षा यंत्रणेशिवाय पत्र्याच्या शेडखाली ठेवला जात आहे. एक छोटी ठिणगी पडली, तरी आगीचा भडका उडत असून लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. नागरी वस्त्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे.