इचलकरंजी : शहरात महापालिका निवडणुकीचे वातावरण तापत असतानाच दुसरीकडे नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक भागांत सात दिवसानंतरही नळाला पाणी आले नाही..त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा करण्याची वेळ आली आहे. पंचगंगा योजनेच्या जलवाहिनीला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. परिणामी, तीन दिवस उशिरा नळाला पाणी येत आहे. त्यामुळे शहरात सर्वत्र पाण्याचा ठणठणाट असल्याचे दिसून येत आहे..Ichalkaranji Water Crisis : रोजगार देणाऱ्या वस्त्रनगरीला पाणी नाही; राजकीय उदासीनतेची किंमत नागरिक देत आहेत.इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीची शहरात सर्वत्र धामधूम सुरू आहे. सर्वत्र उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. पुढील दोन दिवसानंतर प्रचाराला अधिक गती येणार आहे. .अगदी काही दिवसांपूर्वीच इचलकरंजीचा पाणी प्रश्न मीच सोडवणार आहे, असे ठामपणे सांगून गेलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (ता.३) पुन्हा शहरात प्रचार रॅलीच्या निमित्ताने येत आहेत. पण, दुसरीकडे शहरात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. .Ichalkaranji Development : वस्त्रनगरीची ओळख धूसर; राजकीय उदासीनतेत इचलकरंजीचा विकास भरकटला.महापालिका प्रशासन पूर्णतः निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याकडे गांभीर्याने पाहण्यास सध्या तरी कोणाकडेच वेळ नसल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी झालेल्या लोकसभा, विधानसभा आदी बहुतांश निवडणुकांत इचलकरंजीचा पाणी प्रश्नच प्रचाराच्या केंद्रस्थानी राहिला आहे. .निवडणूक झाली की, पाणी प्रश्न गायब होतो, असा अनुभव शहरवासीयांना सतत आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार सतेज पाटील यांनी प्रचार रॅलीवेळी महापालिका सत्तेत आल्यानंतर पाणी प्रश्न आम्ही सोडवणार असल्याचे सांगितले आहे. .त्यामुळे पाणी प्रश्न सोडवण्यापेक्षा तो प्रत्येकवेळी केवळ एक प्रचाराचा मुद्दा बनून राहिला आहे. सर्वात जास्त संवेदनशील बनलेला पाणी प्रश्न आजही सुटला नसताना ऐन निवडणुकीतही नागरिकांना पाणी प्रश्नाची झळ बसताना दिसत आहे..शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मुख्य व एक पर्यायी अशा तीन योजना आहेत. गळतीचे संकट नेहमीचेच आहे. पण, गळती लागणार हे गृहित धरून नियोजन का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. .पंचगंगा योजनेच्या जलवाहिनीला पोवार यांच्या शेताजवळ मोठी गळती लागली. गळती काढण्यासाठी तीन दिवस लागले. त्यामुळे तीन दिवस पंचगंगा नदीतून उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तुट निर्माण झाली. परिणामी, शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. .अनेक भागांत सात दिवसानंतरही पाणी आलेले नाही. कधी पाणी येणार याची शाश्वती नसल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहेत. निवडणूक आचारसंहितेचा धसका महापालिका निवडणूक लागल्यामुळे आंदोलन करण्यावर मर्यादा पडत आहेत. .अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पर्यायी पाण्याचे स्रोत नसलेल्या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विशेषतः महिलांचे हाल होत आहेत. पूर्वी संबंधित परिसरातील राजकीय नेतृत्वाखाली रास्ता रोकोसारखे आंदोलन केले जात होते; पण आता राजकीय नेतृत्वच निवडणुकीत व्यस्त आहे. शिवाय आचारसंहितेची भीती आहे. त्यामुळे तूर्त तरी नागरिकांना स्वतःवरच पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.