इचलकरंजी- इचलकरंजीचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आगामी महापालिका निवडणूकीत तापण्याची चिन्हे आतापासूनच दिसत आहेत. गेल्या अनेक निवडणूकीत प्रचाराच्या केंद्रस्थानी इचलकरंजीतील पाणी प्रश्नच राहिला आहे. त्याचा कोणाला फायदा तर कोणाला फटका बसला आहे. पण अद्यापही हा प्रश्न सुटतांना दिसत नाही. उलट दिवसेंदिवस पाणी प्रश्नाचा गुंता वाढत चालला आहे. आता महाविकास आघाडीने सुळकूड योजनेला सोयीस्करपणे बगल देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केल्यामुळे पाणी प्रश्न पून्हा चर्चेत आला आहे.