कागल, कोल्हापूर : कोरोना लॉकडाउनमध्ये अनेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. त्याचा फायदा काहींनी छंद जोपासले. कांहीनी घरातील सर्वांना उपयोगी पडेल, असा विषमुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी चक्क टेरेस शेतीचा प्रयोग कागल शहरात राबवला आला. यामध्ये येथील जयसिंगराव पार्कमधील तानाजी पाटील व भास्कर चंदनशिवे यांनी कुटुंबीयांच्या सहकार्याने टेरेस शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यासाठी त्यांनी भंगारातील बादल्या, कॅन यांना कुंडीचे स्वरूप दिले. त्यांच्या टेरेसवर मळा बहरला आहे.
येथील जयसिंगराव पार्कमधील तानाजी पाटील व भास्कर चंदनाशिवे यांनी कुटूंबीयांच्या सहकार्याने टेरेस शेती केली आहे. महिनाभरापूर्वी उभारलेल्या या टेरेस गार्डनमध्ये भाजीपाला व फळ रोपे लावली आहेत. या दोघांनी टेरेसवर आंबा, चिकू, सफरचंद, बोर, डाळिंब, पेरू, अंजीर आदी कलमी रोपे आणून लावली आहेत. नारळाच्या शेंड्या, गांडूळ खत, शेणखत, कोकोपीटच्या साह्याने त्यांनी वृक्ष रोपांची लागण केली. तसेच भंगारच्या दुकानातील लहान आणि मोठ्या टाकाऊ बादल्या, कॅन, प्लॅस्टीक बाटल्यांचा वापर कुंड्या म्हणून केला. त्यामध्येही फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, टोमॅटो आदीसह कारले, दोडका आदी वेलवर्गीय भाजीची लागवड केली.
घरातील टाकाऊ चहापूडी व किचनवेस्टचा खत म्हणून वापर केला. महिनाभरापूर्वी लावलेली ही रोपे आता चांगलीच बहरली आहे. गार्डन पाहण्यासाठी परिसरातून लोक येत आहेत. या टेरेस शेतीमधून पाटील कुटुंबीयांना विषमुक्त व नैसर्गिक पद्धतीने पिकलेला भाजीपाला व फळभाजी मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री बंद होण्याची शक्यता लक्षात घेता टेरेस शेतीचे महत्व वाढत जाणार आहे. कागल शहरातील अनेक घरात व टेरेसवर अशा छोट्या-मोठ्या टेरेस शेतीचे, बाल्कनी शेतीचे प्रयोग सुरू आहेत. विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे. टेरेस गार्डनचे युट्युबवरील व्हिडीओ पाहून या सर्वांनी केलेले प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
कोरोना लॉकडाउनमध्ये अनेकांना घराबाहेर पडणे कठीण झाले. त्याचा फायदा काहींनी छंद जोपासले. कांहीनी घरातील सर्वांना उपयोगी पडेल, असा विषमुक्त भाजीपाला पिकविण्यासाठी चक्क टेरेस शेतीचा प्रयोग कागल शहरात राबवला आला. यामध्ये येथील जयसिंगराव पार्कमधील तानाजी पाटील व भास्कर चंदनशिवे यांनी कुटुंबीयांच्या सहकार्याने टेरेस शेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. यासाठी त्यांनी भंगारातील बादल्या, कॅन यांना कुंडीचे स्वरूप दिले. त्यांच्या टेरेसवर मळा बहरला आहे.
येथील जयसिंगराव पार्कमधील तानाजी पाटील व भास्कर चंदनाशिवे यांनी कुटूंबीयांच्या सहकार्याने टेरेस शेती केली आहे. महिनाभरापूर्वी उभारलेल्या या टेरेस गार्डनमध्ये भाजीपाला व फळ रोपे लावली आहेत. या दोघांनी टेरेसवर आंबा, चिकू, सफरचंद, बोर, डाळिंब, पेरू, अंजीर आदी कलमी रोपे आणून लावली आहेत. नारळाच्या शेंड्या, गांडूळ खत, शेणखत, कोकोपीटच्या साह्याने त्यांनी वृक्ष रोपांची लागण केली. तसेच भंगारच्या दुकानातील लहान आणि मोठ्या टाकाऊ बादल्या, कॅन, प्लॅस्टीक बाटल्यांचा वापर कुंड्या म्हणून केला. त्यामध्येही फ्लॉवर, कोबी, वांगी, मिरची, टोमॅटो आदीसह कारले, दोडका आदी वेलवर्गीय भाजीची लागवड केली.
घरातील टाकाऊ चहापूडी व किचनवेस्टचा खत म्हणून वापर केला. महिनाभरापूर्वी लावलेली ही रोपे आता चांगलीच बहरली आहे. गार्डन पाहण्यासाठी परिसरातून लोक येत आहेत. या टेरेस शेतीमधून पाटील कुटुंबीयांना विषमुक्त व नैसर्गिक पद्धतीने पिकलेला भाजीपाला व फळभाजी मिळत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजीपाला विक्री बंद होण्याची शक्यता लक्षात घेता टेरेस शेतीचे महत्व वाढत जाणार आहे. कागल शहरातील अनेक घरात व टेरेसवर अशा छोट्या-मोठ्या टेरेस शेतीचे, बाल्कनी शेतीचे प्रयोग सुरू आहेत. विषमुक्त अन्न ही काळाची गरज आहे. टेरेस गार्डनचे युट्युबवरील व्हिडीओ पाहून या सर्वांनी केलेले प्रयोग इतरांसाठी प्रेरणादायी व अनुकरणीय आहे.
संपादन - यशवंत केसरकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.